कल्याण
आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवता आणि विश्वबंधुत्वाची भावना पसरविण्याचे उदात्त कार्य करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने जनसेवा करत असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, विठ्ठलवाडी कल्याण पूर्व येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 126 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 96 पुरुष तर 30 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.
संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते फित कापून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, समाजसेविका सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक मनोज राय, विक्रम तरे, मोनाली तरे, शरद पाटील, माजी परिवहन समिती सदस्य संजय मोरे आदी मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. मंडळाचे स्थानिक ब्रांच मुखी अविनाश माने यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह