December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाणे जिह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

कल्याण 

हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरात पावसाचा रेट अलर्ट जाहीर केल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे जिल्ह्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांना शिक्षण विभागातर्फे ०९ जुलै (उद्या) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासाठी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं की, सध्याच्या स्थितीत जिल्हात सुरु असलेली अतिवृष्टी विचारात घेता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेनुसार पहिली ते १२ पर्तंतच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना उद्या ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत जाताना आणि येताना विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.