आमदार विश्वनाथ भोईर यांची अधिवेशनात मागणी
कल्याण
चोहोबाजूंनी विस्तार होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून यामध्ये आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत त्यासाठी ककुशीवली धरणाची गरज व्यक्त केली.
गेल्या दशकभरात कल्याण डोंबिवली शहरांमध्ये अनेक मोठमोठाली गृह संकुल उभी राहिली आहेत. या गृह संकुलांमध्ये हजारोंच्या घरात नागरिक राहिला आले असून त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उल्हास नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र सध्याची लोकसंख्या आणि भविष्यातील गरज पाहता पाण्याचे हे प्रमाण आताच तोकडे पडू लागले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी खुशवली धरण आरक्षित करण्याची गरज ठळक मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशन काळात केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटाळी वडवली परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा मोर्चा काढत मुबलक पाणीपुरवठ्याची मागणी केली. त्याचा दाखला देत आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की केवळ याच ठिकाणी नव्हे तर टिळक चौक, पार नाका, बेतुरकर पाडा, रामबाग, जोशी बाग, उंबर्डे अशा प्रत्येक भागामध्येही ऐन पावसाळ्यात पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आमदार भोईर यांनी यावेळी अधोरेखित केले.
तर कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाच्या मागणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर सतत पाठपुरावा करत असून हे धरण आरक्षित करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणातील जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यापार्श्वभूमीवर डिसेंबर 2023 मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही प्रशासन स्तरावर कोणतीही कार्यवाही न झाल्याबाबत आमदार भोईर यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.
तसेच सद्यस्थितीतील पाण्याची समस्या सोडवण्यासह भविष्यातील लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळण्यासाठी कुशिवली धरण कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आरक्षित करण्याची कार्यवाही शासनाने लवकरात लवकर करावी अशी आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध