December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आगरी कोळी शिल्पाचे आमदार भोईर यांच्याकडून लोकार्पण

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचेही भूमिपूजन

कल्याण

कल्याण पश्चिम मतदारसंघातील अटाळी गावात उभारण्यात आलेल्या आगरी कोळी समाजाच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यासह आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून येथील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाचे भूमीपुजनही करण्यात आले.

अटाळी गावामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी समाजाचे प्रतिक म्हणुन हे शिल्प उभारण्याची मागणी केली होती. त्याला आमदार विश्वनाथ भोईर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच त्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर केला. तर सध्याच्या बदलत्या काळात आणि विकासाच्या ओघात आपली शहरे बदलत असून आगरी कोळी समाजाचा ठसा असणारी गावखेडीही नामशेष होत चालली आहेत. अशा परिस्थितीत अटाळी गावामध्ये उभारण्यात आलेले हे शिल्प आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची साक्ष येणाऱ्या पिढीला देतील असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाचेही भूमीपूजन

दरम्यान यावेळी अटाळी गावातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचेही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. अटाळी गावातील हनुमान मंदिर ते नारायण पाटील निवासापर्यंत हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे.

अटाळी गावातील हा मुख्य रस्ता असून तो सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे हा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासुन आभार मानले आहेत.