कल्याण
पूर्वेतील आनंद ग्लोबल स्कूलमध्ये विध्यार्थ्यांना अनुभवातून नागरिकशास्त्राचे धडे प्रत्यक्ष मतदान पद्धतीने देण्यात आले. ह्या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी शाळेचे संचालक आशिष पाटील ह्यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष मतदान केंद्र, मतदान अधिकारी, व्हीव्ही पॅट मशीन, मतदान पेटी, बोटाला शाई लावणे या सर्व प्रक्रियेतून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान करून शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पाडली.
जवळपास तीनशे जणांनी मतदान केले असून यामध्ये सुहानी यादव ही शालेय मंत्री म्हणून १४० मतांनी निवडून आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांना शालेय मंत्रिपद संचालक व मुख्याध्यापक ह्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह