December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न

कल्याण

अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने बदलापूरमध्ये झालेल्या उग्रआंदोलनाचे पार्श्वभूमीवर खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) कल्याणजी घेटे यांनी व खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून बदलापूर येथील घटनेची पुनरावृत्ती आपले शाळेत होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.

ज्यामध्ये शाळेत सर्वत्र जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, कॅमेरे बसवलेले असल्यास ते सुस्थितीत चालू आहे की नाही याबाबत खात्री करून ते बंद असल्यास तात्काळ चालू करून घ्यावेत. मुलींना नैसर्गिक विधी करिता नेण्यासाठी महिला सेविका नेमाव्यात तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. मुलींच्या विभागासाठी महिला कर्मचारी नेमाव्यात त्याचप्रमाणे आपल्या शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी, उपस्थित मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांच्या समस्याबाबत चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात आले. सदर बैठकीकरिता सर्व शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.