December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रैनी कार्निवल : संवाद तरुणाईचा

शहापूर

समता संघर्ष संघटन आणि समता सांस्कृतिक मंच (ठाणे-पालघर-मुंबई) यांचे विद्यमाने शिव-बिरसा-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आयोजित “रेनी कार्निवल : संवाद तरुणाईचा २०२४” हा कार्यक्रम रविवार, ०१ सप्टेंबर २०२४ रोजी शहापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक म्हणून मुंबई लोककला अकादमीचे प्रमुख गणेश चंदनशिवे हे आहेत.

तरुणांच्या अभिव्यक्तीला वाव देणारा हा मंच सांस्कृतिक चळवळीला अधिक गतिमान करणारा ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सदर कार्यक्रमास शहापूर, भिवंडी, परिसरातील महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थी आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समता संघर्ष सांस्कृतिक मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.