December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विद्यार्थी सुरक्षा बैठक संपन्न

कल्याण

कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विठ्ठलवाडी परिसरातील कमलादेवी कॉलेजमध्ये शालेय विद्यार्थी सुरक्षा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीमध्ये कल्याण पूर्वेतील प्राथमिक आणि माध्यमिक तसेच कॉलेजमधील मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन करून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.