कल्याण
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे परीक्षण सुरू झाले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विविध उत्सव मंडळांना पोलीस विभागाने दिलेल्या सूचना, नियमावलीच्या अधीन राहून कायदा व सुव्यवस्था राखून समाजाकरिता प्रबोधनाची कार्य देखावे केले किंवा कसे यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण स्तरावर गणेश उत्सव मंडळाचे निरीक्षण करून निकष व गुणवत्ता ठरवून शिस्तबद्ध गणपती मंडळाची निवड करण्याकरता परीक्षक मंडळ परिमंडळ तीनच्या कार्यक्षेत्रात फिरत आहे.
या परिक्षकांमध्ये डॉ. किशोर देसाई, अतुल फडके आणि उमाकांत चौधरी यांचा समावेश आहे. गणेशोत्सव मंडळाचे निरीक्षण करून निव्वळ व गुणवत्ता ठरवून शिस्तबद्ध गणपती मंडळाची निवड करण्यात आलेल्या गणेश मंडळांना पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्यातर्फे प्रतिष्ठित पत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह