December 4, 2024

news on web

the news on web in leading news website

सामाजिक कार्यकर्त्या सुहासी रवींद्र चव्हाण, डॉ. सुप्रिया बांबरकर, डॉ. नीमेश लोध, डॉ. राकेश पाटील, डॉ. सागर गायकवाड आदी मान्यवर

एम्स हॉस्पिटलचा ‘शक्ती’ ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप

रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पाठींबा देण्यासाठी अनोखा उपक्रम

डोंबिवली

स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त एम्स हॉस्पिटलने स्तनाच्या कर्करोगाने पिडीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी “शक्ती” ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार प्रवासादरम्यान आधार देणे, त्यांना आजाराशी लढण्याकरिता प्रेरणा मिळावी याकरिता कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचाही यामध्ये समावेश असणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सुमारे 150 कर्करुग्ण तसेच कर्करोगातून वाचलेले रुग्ण, कुटुंब आणि वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुहासी रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुप्रिया बांबरकर (संचालक- ऑन्कॉलॉजी विभाग,ऑन्कोसर्जन), डॉ. नीमेश लोध(ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) डॉ. राकेश पाटील(वैद्यकीय आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. सागर गायकवाड( रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट) आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शक्ती’ सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून महिलांना स्तनाच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, स्वयं-तपासणीला प्रोत्साहन देणे, निदान समजून घेणे आणि उपचारांसंबंधी माहिती पुविण्याचे काम केले जाते. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून त्याविषयी जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. बऱ्याच स्त्रिया अनेकदा गाठ किंवा असामान्य बदल यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे निदानास विलंब आणि गंभीर परिणाम होतात.

स्तनाचा कर्करोग हा देशभरातील महिलांना होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. दुर्देवीची गोष्ट म्हणजे, बऱ्याचदा सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते जसे की स्तनांच्या गाठी, स्तनाग्रांमध्ये बदल किंवा असामान्य वेदना याकडे फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. त्यामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना त्यांचे अनुभव सांगणे तसेच मानसिकरिता पाठबळ मिळविण्यास मदत होते. एम्स हॉस्पिटलमधील ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नीमेश लोध यावर भर देतात की योग्य काळजी आणि पाठिंब्याने, उपचारानंतर बरेच लोक सामान्य आयुष्य जगु शकतात. ज्यांनी या आव्हानांचा सामना केला आहे त्यांचे खरोखरच कौतुक आहे.

‘शक्ती’ या आमच्या नवीन उपक्रमासह, आम्ही स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. आम्ही महिलांना स्वयं-परीक्षणासाठी आणि वयाच्या पस्तीशीनंतर नियमित मेमोग्राम करण्याचा सल्ला देतो. या प्रवासात कोणालाही एकटे वाटू नये हेच आमचे ध्येय आहे. एकत्रितपणे आम्ही एकमेकांना आधार देऊ शकतो. हे लक्षात असू द्या की, स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास सकारात्मक उपचार करता येतात, त्यामुळे कधीही आशा सोडू नका अशी प्रतिक्रिया एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथील वैद्यकीय आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राकेश पाटील यांनी व्यक्त केली.

एम्स हॉस्पिटल केवळ रोगांवर उपचार न करता रुग्णांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठीही तितकेच प्रयत्नशील आहे. हा उपक्रम स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या महिलांना या आजाराशी लढण्यासाठी आणि त्यावर मात करण्यास नक्कीच मदत करेल ही मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या सुहासी रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.