December 4, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न

कल्याण

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण तर्फे २४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केलेली भव्य मॅरॅथॉन अतिशय उत्तमपणे संपन्न झाली. भारतभरातून सर्व वयोगटातील मिळून सुमारे २,००० धावपटू या मॅरॅथॉनमध्ये सहभागी झाले होते. तसेच कल्याण जवळील एका गतिमंद विद्यालयातील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.

रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे चालवल्या जाणाऱ्या रोटरी दिव्यांग सेंटरच्या मदतीसाठी व इतर समाजाभिमुख सेवा प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी कल्याणमध्ये या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

ही मॅरेथॉन TDAA (Thane District Athlete Association) आणि AIMS (Association of International Marathon and Distance Races) प्रमाणित होती.

रोटरी स्पोर्टस सर्कल-भंडारी चौक, गांधारी ब्रीज जवळ, नवीन रिंग रोड, कल्याण पश्चिम येथून या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. फुल मॅरॅथॅान पहाटे ३.०० वाजता, हाफ मॅरॅथॅान ५.३०० वाजता, १० किमी ६.०० वाजता, ५ किमी ७.३० व ३ किमी ८.०० वाजता सुरू झाली. 

बोरगावकर ग्रुपचे अध्यक्ष संजय बोरगावकर व रोटरी ठाणे जिल्ह्याचे प्रांतपाल रो. दिनेश मेहता यांच्या हस्ते विजेत्यांना पारितषिके देण्यात आली.

या संपूर्ण मॅरॅथॉनमधे फार उत्साहवर्धक व जल्लोषाचे वातावरणात होते. तसेच धावायच्या मार्गावर जागोजागी पिण्याचे पाणी, एनर्जी बुस्टर्स यांची उत्तम सोय होती असे सहभागी धावपटूंनी सांगितले आणि आयोजकांचे आभार मानले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका, महाराष्ट्र पोलीस, वहातूक नियंत्रण कक्ष यांचे या मॅरॅथॅानसाठी विशेष सहाय्य मिळाले. तसेच इतर अनेक सामाजिक संस्थांनी आयोजनात मदत केली.