April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी : आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण

कल्याणच्या योगीधाम परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. कल्याणात झालेल्या या प्रकाराने आपण आश्चर्यचकित झालो असून याप्रकरणी राजकारण करू नका. मात्र संबंधित व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी याप्रकरणी स्पष्ट केले आहे.

https://youtu.be/uxJNvuaQ8CM

कल्याण हे सर्व जाती धर्मांना एकत्रित सांभाळून चालणारे ऐतिहासिक शहर असून इथे अशी घटना घडते. मात्र त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये यातील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. कल्याणातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेला हा प्रकार बघून आपण आश्चर्यचकित झालो आहोत, अशा ठिकाणी असा प्रकार करणारे ज्या प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे आणि कठोरात कठोर शिक्षा होणे हे गरजेचे असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले.

https://x.com/RajThackeray/status/1870030890774188154?s=19

पोलिसांनी आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करावी. अन्यथा उद्या आपण हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे. तर हे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून सर्व समाजातील लोकांनी शांतता पाळावी, शहरातील शांततेला गालबोट लागेल असं काही करू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.