April 11, 2025

news on web

the news on web in leading news website

पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये : रोहन घुगे

ठाणे

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.

गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बालकांच्या पालकांनी सहकार्य करावे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले आहे.