सोनल सावंत – पवार
डोंबिवली
डोंबिवलीतील मानपाडा रोडवर MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेवर आधारित आकर्षक भिंतीचित्रांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक आणि अध्यक्ष विशाल शेटे यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भिंतीचित्रांमध्ये रस्ता सुरक्षा नियमांवर भर दिला जाणार आहे. चालक आणि पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने या भिंती चित्रांचे डिझाईन आणि संकल्पना पुरवण्यात आली असून, या चित्रांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे मानपाडा रोड परिसर अधिक आकर्षक तर होईलच, आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होईल. विशाल शेटे, अध्यक्ष
आणखी बातम्या
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
गुर्जर उद्योग परिषदेत उत्साह