सोनल सावंत पवार
डोंबिवली
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या अतुलनीय पराक्रम आणि शौर्यगाथा सांगणारा “छावा”चित्रपट सध्या देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. “छावा” चित्रपटाला शिवप्रेमींचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून डोंबिवली येथील मधुबन चित्रपटगृहात शिवसेनेकडून ‘छावा’ चित्रपटाचा मोफत शो दाखविण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजेश मोरे यांनी आयोजन केले होते. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा व छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्य करता आपले बलिदान कसे दिले हे चित्रपटातून पहावे असे आमदार मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत असून संभाजी राजेंची भूमिका त्यांनी अक्षरशः जिवंत केल्याच्या प्रतिक्रिया शिवप्रेमी देत आहेत. चित्रपट पाहताना शिवगर्जनांनी चित्रपटगृह दणाणून निघाला तर एकीकडे डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले.
आणखी बातम्या
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता