The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

२० मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

आमदार राजेश मोरे यांनी घेतला कामाचा आढावा

डोंबिवली

कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली ढोकळी पिसवली परिसरात राज्य शासनाच्या अमृत योजनेतून रस्त्याची कामे सुरु असून या परिसरातील तलावाचे सुशोभिकरण देखील सुरु करण्यात आले. तर रस्त्याच्या कडेने जाणारे गटारे, पाण्याच्या टाक्या आणि अमृत योजनेतून पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्याची कामे सुरु असून या कामाची आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे संबधित विभागाचे अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या कामाचा वेग वाढवत २० मार्च पर्यत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याचे आदेश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अमृत योजनेतून मागील अनेक वर्षापासून कामे सुरु असून या कामासाठी जागा मिळत नसल्याचे कारण देत पाण्याच्या टाक्याचे काम संथगतीने सुरु आहे. तर नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याची कामे देखील अतिशय संथगतिने सुरु असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या परिसरातील रस्त्याची कामे देखील शासनाच्या विविध निधीतून सुरु असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर आडीवली ढोकळी पिसवली परिसराचे रुपडे पालटणार आहे. यामुळेच रस्ता, तलाव सुशोभिकरण, जलवाहिन्या गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान रस्त्याच्या कामात महावितरणच्या ट्रान्सफार्मरचा अडथळा येत असल्याने हा ट्रान्सफार्मर रस्त्याच्या मागच्या बाजूला स्थलांतरीत करण्यासाठी संबधित जागा मालकाशी चर्चा करत या जागेच्या बदल्यात अपेक्षित मोबदला महापालिकेकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी जागामालकाला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *