टिटवाळा सावरकर नगरमध्ये विकासकामांचे भूमीपूजन
कल्याण
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने विकासकामे सुरू असून टिटवाळा परिसराचाही सर्वांगीण विकास करण्याच्या ध्यासाने आपण कार्य करीत असल्याचा विश्वास भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून आणि माजी उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या पाठ पुराव्यातून सावरकर नगर परिसरात विविध विकासकामे करण्यात येत असून त्यांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
नरेंद्र पवार यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्राचे माजी राज्यसभा खासदार व्हि. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून काही दिवसांपूर्वीच गाळेगाव परिसरात विकासकामांचे भूमीपूजन संपन्न झाले. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक 9 सावरकर नगर परिसरातही विविध विकासकामे केली जाणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.
येत्या काळात कल्याण विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघ परिसरात आजच्या घडीला अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामध्ये मोहने आणि टिटवाळा परिसरही विकास कामांपासून अजिबात वंचित राहू देणार नाही. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून या भागाला मुख्य प्रवाहामध्ये आणणे हेच आपले प्रमूख ध्येय असल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नमूद केले.
दरम्यान यावेळी ह.भ.प. चंद्रभान सांगळे महाराज, कल्याण डोंबिवलीच्या माजी उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सावरकर नगर येथील अंतर्गत रस्ते आणि झाकणासह गटार बांधकाम या विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात झाले.
यावेळी भाजपा मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, प्रदेश सहसंयोजक उद्योग आघाडी परेश गुजरे, जेष्ठ कार्यकर्ते नारायण मिरकुटे, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील, सरचिटणीस संतोष शिंगोळे, अनंता पाटील, अमोल केदार वार्ड क्र.९ मांडा पूर्व अध्यक्ष दिपक कांबळे, वार्ड क्र.८ मांडा पश्चिम अध्यक्ष रुपेश भोईर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देशपांडे, भूषण बापट, चेतन कान्हेरे, ब्रिजेश पांडे, संजय आधंगळे, स्वप्निल पाठारे, महेश घोलप, शैलेश गिरी,विनोद इंगळे, हेमंत गायकवाड तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव, भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी बातम्या
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता