April 11, 2025

news on web

the news on web in leading news website

क्रिकेट स्पर्धेला राज ठाकरे यांची उपस्थिती

डोंबिवली

जय दुर्गा माता क्रिकेट संघ, काटई आयोजित हेदुटणे गावाजवळील कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीत डे-नाईट क्रिकेट महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवली येथील कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक -२०२५ या महास्पर्धेला भेट देऊन क्रिकेटपटूचे मनोबल वाढवून नाणेफेक व प्रथम पारितोषिकाचे अनावरण केले.

रायगड आणि ठाणे या दोन्ही संघाचे स्वागत केले. यावेळी स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीत राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करीत असताना जोरदार फटाक्यांची आतिषबाजी आणि लाईट शो करण्यात आला. राज ठाकरे यांचा सन्मान देखील करण्यात आला.

यावेळी माजी आमदार रमेश पाटील, माजी आमदार राजु पाटील, विजय पाटील आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.