April 11, 2025

news on web

the news on web in leading news website

राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

दिल्ली

गाजियाबाद दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत 16 राज्यांनी सहभाग घेतला होता भारतातील बलाढ्य राज्याच्या संघांना पराभूत करून महाराष्ट्राच्या क्रीडा विश्व न्यास या संघाने राजस्थान संघाला 40/19 अशा 21 गुणांनी पराभूत करून राष्ट्रीय पॅरा कब्बडी त अंतिम विजेतेपद प्राप्त केले.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून राज राठोड व सर्वोत्कृष्ट पकडपट्टू म्हणून मंगेश जाधव यांना गौरविण्यात आले. कर्णधार सहदेव बर्डे, उपकर्णधार सचिन तांडेल, राज राठोड, अमन मणियार, मंगेश जाधव, ओमकार महाडिक, हितेश पाटील, राज राणे, महेश वसावे, महेंद्र जगताप, निलेश बाथे, रामेश्वर कुर्वेले या खेळाडूंनी मोलाची कामगीरी पार पाडली. तसेच संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मदन झा फिटनेस ट्रेनर दिशांत पाटिल व संघ व्यवस्थापक दिनेश कटोडिया या सर्वांचे विजयामागे मोलाचे सहकार्य लाभले.

यास स्पर्धेला प्रमुख प्रशिक्षक म्हणून दिव्यांग प्रशिक्षक रवींद्र सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांग क्रीडा विश्वनाथ संस्थेचे अध्यक्ष पंकज चौधरी व मार्गदर्शक संदीप पाटील, बटू निकम, अनिता मोजाड यांचे अमूल्य मार्गदर्शन या दिव्यांग कबड्डीपटूंना लाभले.

दिव्यांग कबड्डीला प्रोत्साहित करण्याकरता बेंगॉल वॉरिअर संघासोबत कॅप्री स्पोर्ट्स आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडून दिव्यांग खेळाडूंना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षक शिबिराचे आयोजन करून खेळाकरीता आवश्यक असे साहित्य वाटप करून दिव्यांग खेळाडूंचा आत्मविश्वास व मनोबल वाढवले. त्यामु़ळे त्यांचा खेळ बहरून आला आणि त्यामुळे हा कार्यक्रम या संघाला उपयुक्त ठरला.