October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

नेत्रचिकित्सा शिबिरात ३०२ नागरिक लाभान्वित

संत निरंकारी मिशनचे आयोजन

मुंबई

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, विले पार्ले येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुमारे ३०२ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मिळाला.

या शिबिरात २१ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रियेसाठी के.बी.हाजी बच्चू अली चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. याशिवाय ९६ रुग्णांना तपासणीनंतर नंबर लावून चष्मे देण्यात आले. इतरांना आवश्यक त्या औषधांचा पुरवठा व डोळ्यांची निगा राखण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरामध्ये के.बी.हाजी बच्चुअली नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या ८ सदस्यीय टीमने नेत्र चिकित्सेची सेवा निभावली.

मिशनच्या समाज कल्याण विभागाच्या प्रेमा ओबेरॉय यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. शिबिराचा शुभारंभ सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकार प्रभूच्या प्रति प्रार्थनेद्वारे करण्यात आला. सेक्टर संयोजक जे. पी. उपाध्याय आणि सेवादल स्वयंसेवकांच्या सहाय्याने हे शिबिर यशस्वीरित्या राबविण्यात आले.

संत निरंकारी मिशनच्या वतीने यासारखेच मोफत नेत्र तपासणी शिबिर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी वरळी नाका महानगरपालिका शाळेत सकाळी ९ ते १ या वेळेत आयोजित केले जाते. त्याची नोंदणी सकाळी ९ ते ११ दरम्यान होते. हे शिबिरही सर्वांसाठी मोफत आहे.