October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

डॉ. आनंद धवन यांचा पुढाकार

कमीत कमी खर्चात उपचाराची हमी

निभा हेल्थ केअरचे कल्याणमध्ये नवीन रुग्णालय सुरू

कल्याण
सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘निभा हेल्थ केअर सेंटर’ तर्फे कल्याणमध्ये नवीन रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामागे डॉ. आनंद धवन यांचा पुढाकार असून, त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. धवन यांनी सांगितले की, सध्या टिटवाळा, मोहने आणि कल्याण या ठिकाणी चार रुग्णालये ‘निभा केअर’शी जोडलेली आहेत. “इतर रुग्णालयांमध्ये जिथे 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च होतो, तिथे निभा केअरशी संलग्न रुग्णालयांमध्ये फक्त 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो – तोही औषधांसह,” अशी माहिती त्यांनी दिली.

रुग्णांना मिळणाऱ्या सवलतींची माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की, औषधांवर 35% पर्यंत सवलत, लॅब तपासणीत 30% सवलत, हे लाभ प्रत्येक कार्डधारक रुग्णासाठी उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, निभा हेल्थ केअरचे सदस्यत्व पूर्णपणे विनामूल्य असून, नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना एक फ्री हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सेवा सुलभ दरात उपलब्ध करून देणे हा आहे.
डॉ. धवन यांनी या सेवेला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर विस्तारण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाला डॉ. दिनेश डोळे (जनरल सर्जन), डॉ. अमरितांशू सिन्हा (बालरोगतज्ज्ञ), डॉ. प्रिती सिन्हा (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. आविद अली (गायत्री हॉस्पिटल) आणि माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.