October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

डोंबिवलीचा प्रथमेश 95.60% गुणांसह झळकला

कराटे-बुद्धिबळमध्येही राज्यस्तरीय कामगिरी

डोंबिवली

पी. अँड. टी. कॉलनी येथील रॉयल इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश भगत याने 2024-25 च्या दहावीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवत विशेष मानाचे यश संपादन केले आहे. तो सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पी. बी. भगत यांचा नातू आहे.

मधुसूदन हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहित काकू सन्मान करताना…

प्रथमेशने नर्सरीपासून नववीपर्यंत प्रत्येक इयत्तेत 95% पेक्षा अधिक गुण मिळवून आपली गुणवत्ता सातत्याने सिद्ध केली आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही त्याने झळाळते यश मिळवले असून 2018 पासून कराटे आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये राज्य व जिल्हा स्तरावर 8 सुवर्ण, 15 रजत आणि 4 कांस्य पदके मिळवली आहेत. 2023 मध्ये कॅलिफोर्निया रजिस्टर फुनाकोशी शोटोकन ऑर्गनायझेशनतर्फे त्याला ब्लॅक बेल्ट किताब प्रदान करण्यात आला होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण व अन्य सन्मानित करताना..

या व्यतिरिक्त प्रथमेशला साहित्य अकादमी, जळगावतर्फे 2018 मध्ये बालकलाकार पुरस्कार, तसेच शाळेचा बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड 2018 मिळाला आहे. त्याच्या यशाबद्दल आगरी समाज प्रतिष्ठान, डोंबिवली जिमखाना, रॉयल इंटरनॅशनल स्कूल, तसेच विविध मान्यवर व संस्थांकडून नागरी सन्मान करण्यात आले आहेत.

आमदार राजेश मोरे शुभेच्छा देताना..

आपल्या यशाचे श्रेय प्रथमेशने आई-वडिलांसह शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. राखी सिंग, समन्वयक अनु (राणी) जैन, वर्गशिक्षक वाध्येश्वर तिवारी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व मार्गदर्शकांना दिले आहे. त्याने पुढे भौतिकशास्त्रज्ञ (Physicist) होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.