रौप्य महोत्सव वर्षात पत्रकार हितासाठी नव्या उपक्रमांची घोषणा
कल्याण
कल्याण प्रेस क्लबला यंदा २५ वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सव वर्षात विविध उपक्रम राबवण्यासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. या निवडीत लोकमतचे छायाचित्रकार आनंद मोरे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली.
नवीन कार्यकारिणीत ठाणे वैभवचे कुणाल म्हात्रे यांची कार्याध्यक्ष, प्रजाराजचे संपादक विष्णुकुमार चौधरी यांची सचिव, तसेच ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर, नवभारतचे अशोक वर्मा उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. लोकमतचे सचिन सागरे खजिनदार तर कार्यकारिणी सदस्य म्हणून नवीनभाई भानुशाली, अतुल फडके, लोकशाही न्यूजचे अशोक कांबळे, सामनाचे दत्ता बाठे, प्रजाराजचे रवी चौधरी यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुचिता करमरकर व लोकसत्ताचे दीपक जोशी यांची नेमणूक झाली आहे.
अध्यक्ष आनंद मोरे यांनी यावेळी सांगितले की, “पत्रकारांना शासनाच्या विविध योजना, शासकीय कोट्यातून घरे, विमा योजना, मेडीक्लेम, व इतर सेवा-सुविधा मिळवून देण्यासाठी प्रेस क्लब कार्य करणार आहे. यासोबतच रौप्य महोत्सवाचे आयोजन सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने भव्य स्वरूपात पार पाडण्यात येणार आहे.”
सभेत मागील आर्थिक ताळेबंद सादर करून मंजूर करण्यात आला. याशिवाय पत्रकार-प्रशासन संवाद, सायबर क्राईम व सोशल मिडिया मार्गदर्शन सेमिनार, पत्रकार सन्मान, परिसंवाद यासारखे उपक्रम हाती घेण्याची योजना असल्याची माहितीही देण्यात आली.
कार्यकारिणीच्या या निवडीनंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अध्यक्ष आनंद मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत विश्वासाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम