October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण-शिळफाटा मार्ग वाहतूक कोंडी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पोलिसांना निवेदन,

आंदोलनाचा इशारा!

सोनल सावंत-पवार

डोंबिवली

डोंबिवली शहर आणि विशेषतः कल्याण-शिळफाटा मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मेट्रो कामातील कंत्राटदारांचा बेशिस्तपणा आणि शहरात बेकायदेशीरपणे धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे ही समस्या चिघळत चालली आहे. परिणामी, रोजच्या प्रवासात नागरिकांना अनेक तास कोंडीत अडकून बसावे लागत आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सक्रिय झाली आहे. पक्षाने कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांची भेट घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी लेखी निवेदन सादर केले.

  • निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण
    मेट्रो कामासाठी पर्यायी मार्ग योजना
    वाहतूक पोलीस दलाची संख्या वाढवणे

या भेटीत डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र (भाऊ) पाटील, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष मधुकर माळी आणि डोंबिवली शहर कार्याध्यक्ष रविकिरण बनसोडे उपस्थित होते.

पक्षाने प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.