October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम

पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची नवी दिशा

कल्याण

कल्याण पूर्व विभागातील ड वार्ड मध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरतर्फे राबविण्यात आलेल्या ‘अमृत जल’ या उपक्रमाचे उद्घाटन सहा आयुक्त उमेश यमगर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी यमगर साहेबांनी स्वतःच्या हस्ते पीओपीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून प्रकल्पाची सुरुवात केली. ‘अमृत जल’ या उपक्रमामध्ये पीओपी मूर्तीचे विघटन होऊन पर्यावरणाचे रक्षण घडते. अंबरनाथमध्ये गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात मात्र प्रथमच या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

सदर उपक्रम नानापावशे चौक व आमराई चौक येथे राबविण्यात आला. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष भूषण कोठावदे, प्रकल्प प्रमुख विजय भोसले आणि सेक्रेटरी दक्षता रानडे उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील आमराई चौकात या उपक्रमाचा यशस्वी समारोप झाला.

पर्यावरणपूरक विसर्जनाची ही संकल्पना समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.