October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५

पडघा

तरुणाईला विचारमंथन व अभिव्यक्तीचे व्यासपीठ देणारा “रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५ – पर्व तिसरे” हा भव्य कार्यक्रम पडघा येथील रिव्हर टच रिसॉर्ट येथे रविवार, १४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडणार आहे.

या मंचावर कथा, कविता, नाटक आणि ससंद संवादातून भिवंडी, मुरबाड, आसनगाव, शहापूर, बदलापूर, कल्याण, ठाणे व मुंबईतील अनेक तरुण सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले “उठाव मंच – कविसंमेलन” कवी विवेक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, बबन सरवदे, सुदेश जगताप, गजानन गावंडे, संदेश कर्डक यांसारखे नामवंत कवी सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन सुरेखा पैठणे आणि प्रा. सोनाली अहिरे करणार आहेत.

निसर्गरम्य वातावरणातील हा बहारदार कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, आयोजकांनी सर्वांना मनःपूर्वक आमंत्रित केले आहे.