October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

शिवसेनेचा नवा अध्याय – एकता नगरात कार्यालयाचा शुभारंभ

डोंबिवली

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते एकता नगर येथे माजी नगरसेवक राजन मराठे व ज्योती मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

काही दिवसांपूर्वीच राजन मराठे, ज्योती मराठे आणि त्यांचा चिरंजीव सूरज मराठे यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे डोंबिवलीत मोठी राजकीय चर्चा रंगली होती. मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने मराठे कुटुंबीयांच्या सहभागामुळे एकतानगर विभागात शिवसेनेचा प्रभाव अधिक बळकट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या नव्या प्रवासाला प्रेरणा व बळ मिळाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल,” माजी नगरसेवक राजन मराठे 

या प्रसंगी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना कल्याण जिल्हाप्रमुख जितेन पाटील, तसेच माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, कविता गावंड, सागर जेधे, अभिषेक चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.