October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार

कल्याण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत) आयोजित बहुजन महामाता जनजागृती महोत्सव २०२५ मध्ये सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत स्टडी व्हेवज बहुउद्देशीय संस्था, कल्याण या संस्थेला ‘विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचा उद्देश समाजातील जागृतीत सक्रीय सहभाग घेणाऱ्या महामातांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि ज्ञानज्योत प्रज्वलित करणे हा होता. महोत्सवात विविध विषयांवर व्याख्याने आणि समाज परिवर्तनशील विचार अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांसोबत संवाद साधण्याची संधीही उपलब्ध झाली.

स्टडी व्हेवज संस्थेच्या कार्यामुळे समाजातील जनजागृती अधिक बळकट होत असून, हा पुरस्कार पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्टडी व्हेवज संस्थेच्या प्रतिनिधीने या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी आणि पुरस्कारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीचे मनःपूर्वक आभार मानले.