अंबरनाथ
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, अंबरनाथ नाट्यगृह आणि समाज मंदिर या महत्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी करून कामाला गती देण्याचे आदेश दिले.
साई सेक्शनमधील अटल सूर्योदय उद्यानाचा विकासही लवकरच पूर्ण होणार असून, नागरिकांच्या सूचनांनुसार प्रकल्प अंतिम रूपात राबविण्याचे आश्वासन दिले. शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पात भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ, नंदी, भक्तनिवास आणि घाट यांचा समावेश असून, १४० कोटी रुपयांच्या निधीत हे काम सुरु आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीत उभारण्यात आलेले नाट्यगृह लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. तसेच, साई सेक्शन उद्यान विकासासाठी ५ कोटींचा निधी राखीव आहे. खासदार डॉ.शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधून कामाचे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार
शिवसेनेचा नवा अध्याय – एकता नगरात कार्यालयाचा शुभारंभ