नागरिकांच्या सुरक्षेसाठी संदीप गायकर यांचा पुढाकार
कल्याण
भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर प्रभागातील नागरिकांना सुरक्षा आणि स्वच्छतेची अनोखी भेट देण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील ७ नंबर प्रभागात तब्बल ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, येत्या त्रिपुरी पौर्णिमेपासून या प्रकल्पाला प्रारंभ होणार असल्याची माहिती केडीएमसीचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी दिली.
या कॅमेऱ्यांमुळे—
महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट होणार
“कचराकुंडी मुक्त प्रभाग” या संकल्पाला गती मिळणार
रस्त्यांवरील स्वच्छता आणि शिस्तीवर देखरेख ठेवली जाणार
बेतुरकर पाडा, ठाणेकर पाडा, फडके मैदान, काळा तलाव, सिद्धेश्वर आळी या महत्त्वाच्या परिसरात कॅमेरे बसवण्याचे काम प्राधान्याने केले जाईल.
भाऊबीज ही बहिणींच्या सुरक्षेचे प्रतीक मानली जाते. त्याच भावनेतून संपूर्ण प्रभागातील नागरिकांची सुरक्षा, स्वच्छता आणि शिस्त यांना नवसंजीवनी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे गायकर यांच्यावतीने सांगण्यात आले.













Leave a Reply