डोंबिवली
समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविण्यासाठी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे “सहकार्य रत्न २०२५” पुरस्कारांचे वितरण सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडला. या सोहळ्यात डोंबिवलीतील सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते विशाल शेटे यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशाल शेटे हे रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत असून, विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्रे घेऊन विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता अपघात टाळण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन करतात. “शून्य अपघात” हे ध्येय समोर ठेवून ते अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.
कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी निस्वार्थ भावनेने समाजासाठी सेवा बजावली. त्यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरविले होते.
सतत समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या आणि लोकांना सहकार्याची प्रेरणा देणाऱ्या विशाल शेटे यांच्या कार्याचा गौरव म्हणून खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनील खर्डीकर यांनी त्यांना “सहकार्य रत्न २०२५” हा सन्मान प्रदान केला.
या सन्मान सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, सिनेअभिनेते सतीश नायिकोड तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.













Leave a Reply