डोंबिवली
कबड्डी क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीचे नाव देशभर उज्ज्वल करणारा आयरे गावातील युवा खेळाडू अरकम सादिख शेख याने नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया प्रो कबड्डी लीग सीझन १२ मध्ये आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर अंतिम विजेतेपद पटकावून अभिमानास्पद यश संपादन केले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून संघर्ष करत मेहनत, जिद्द आणि कठोर सराव यांच्या बळावर अरकमने गाठलेले हे यश डोंबिवलीकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अरकमच्या या यशाबद्दल त्याचा सन्मान व उत्साहवर्धन करण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, नांदिवलीचे माजी सरपंच अनिल म्हात्रे, संगिता म्हात्रे, नीरज म्हात्रे तसेच गावातील पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत त्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना अरकम शेख म्हणाला, “मेहनत कधीच वाया जात नाही. डोंबिवली आणि माझ्या गावाचे नाव मोठे करण्याचे स्वप्न मी जपत राहीन.”
कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला प्रोत्साहन मिळावे, नव्या पिढीने मैदानी खेळात उतरून स्वतःला विकसित करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.













Leave a Reply