अंबरनाथ
अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गाव परिसरातील एमआयडीसी जलशुद्धीकरण प्रकल्पाची आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली २७ गावांच्या लोकप्रतिनिधींसह पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात उल्हासनदीतून होणारा पाणी उपसा प्रत्यक्ष पाहण्यात आला. तसेच गाळणी केंद्र (ट्रीटमेंट प्लांट), पाणी संकलन केंद्र आणि पाणी वितरण केंद्र (डिस्ट्रिब्युशन प्लांट) यासह संपूर्ण प्रकल्पातील प्रक्रिया आमदार मोरे यांनी सखोलपणे समजून घेतल्या.

प्रकल्प पूर्णपणे सोलार उर्जेवर चालतो याची माहिती मिळाल्यानंतर आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. “सरकारचा खर्च वाचवण्यात तुमचा हातभार महत्त्वाचा आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
तसेच भविष्यात २७ गावांना अधिक कार्यक्षम, सातत्यपूर्ण आणि मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रकल्पातील अडचणींबाबत MIDC चे उपअभियंता अमोल मसुरकर यांनी सविस्तर माहिती दिली.
या पाहणी दौऱ्यात शिवसेना शहर सचिव संतोष चव्हाण, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, संघर्ष समिती नेते दत्ता वझे, नगरसेवक मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे, लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, विभागप्रमुख विजय भाने, भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, गणेश भाने आणि MIDC चे इतर अधिकारी उपस्थित होते.













Leave a Reply