Power by The Web Cloud Media

अंबरनाथ : नगरपालिका निवडणुकीला सुरूवात; शिवसेनेची दमदार उपस्थिती

अंबरनाथ

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी अर्ज भरताना रॅली काढली.

अंबरनाथमधील शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय निश्चित असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. शहरात झालेल्या विकासकामांच्या बळावर अंबरनाथकरांची शिवसेनेवरील निष्ठा कायम राहील, असेही ते म्हणाले.

या प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी तसेच सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *