Power by The Web Cloud Media

जेव्हा ती बोलू लागते काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कल्याण

आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ता कवयित्री सुरेखा पैठणे लिखित ‘जेव्हा ती बोलू लागते’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन कल्याण येथे आचार्य कॉन्फरन्स हॉल येथे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिका प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरुड, प्रा.डॉ सुदाम राठोड, डॉ. विठ्ठल शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा कांबळे, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘जेव्हा ती बोलू लागते’ या कविता संग्रह पुस्तकाच्या लेखिका सुरेखा पैठणे असून ९० पानांच हे काव्यसंग्रह आहे. यात सामाजिक तर विविध प्रकारच्या कवितांचा सामवेश आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील हे पहिले काव्यसंग्रह आहे.

जो प्रवाह भारतीय संविधानातली मूल्य मानतो, तो प्रवाह मुख्य प्रवाह आहे. या काव्यसंग्रहातील कविता दुःखावर , संघर्षावर मात करून विजयाची पताका फडकवणारी कविता आहे. म्हणून त्या कविता आम्हाला जवळच्या वाटतात असे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. अशालता कांबळे यांनी बोलतांना सांगितले.

आंबेडकरी स्त्रीने कुठल्याच वाटा गुंडाळल्या नाहीत. तिने समष्टीची भाकर पदरी बांधून प्रवास केलेला आहे. जेव्हा ती बोलू लागते’ काव्यसंग्रहातील कविता येणाऱ्या चौथ्या आंबेडकरी पिढीची फार महत्त्वाचं प्रतिनिधित्व करेल असे यावेळी डॉ. श्यामल गरुड यांनी बोलताना सांगितले.

कवयित्री सुरेखा पैठणे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘जेव्हा ती बोलू लागते’ या काव्यसंग्रहाचा उलगडा करून आपले मनोगत व्यक्त केले. ‘जेव्हा ती बोलू लागते’ काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन मिलिंद जाधव, अक्षय भोईर, वैभवी अडसुळे यांनी केले.

यावेळी प्रा. सिद्धार्थ मोरे, बबन सरवदे, छाया कोरेगावकर, सिंधु रामटेके, उत्तम जोगदंड, शिवा इंगोले, राज असोरोंडकर, सुधीर चित्ते, शिवाजी रगडे तर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *