अधिकारी व कर्मचार्यांसाठी पोस्ट विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी
ठाणे
जिल्हा परिषद, ठाणे आणि ठाणे प्रधान डाक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना पोस्ट विभागाच्या विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी पोस्टल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प बुधवार शुक्रवार, 19 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पहिला मजला, सभागृह येथे पार पडत आहे.
कॅम्पमध्ये नवीन आधार नोंदणी, आधार दुरुस्ती व बाल आधार सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), सुकन्या समृद्धी खाते तसेच विविध गुंतवणूक योजनांची माहिती व नोंदणी सुविधा देण्यात येत आहे.
या कॅम्पमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच पोस्ट विभागाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळत असल्याने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.













Leave a Reply