महापालिका आयुक्त अभिनव गोयल
कल्याण
समुपदेशन केंद्र ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आणि वुमन्स वेल्फेअर फाउंडेशन या एनजीओच्या मदतीने कल्याण पश्चिम येथील चिकणघर परिसरात उभारण्यात आलेल्या समुपदेशन केंद्राच्या शुभारंभ समयी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
शहरातील दुर्बल घटकांसाठी महापालिकेमार्फत विविध योजना राबविल्या जातात. मुली,जेष्ठ नागरिक, महिला यांना घर, कार्यालय ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्या मांडण्यासाठी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. आरोग्यदायी आणि संतुलित सोसायटीसाठी समुपदेशन केंद्राची मदत होणार असून या समुपदेशन केंद्राचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तणाव मुक्ती शिबिरांचे आयोजनही करावे अशा सूचना आयुक्त गोयल यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
सध्याच्या युगातील बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेमुळे अनेक समस्या उद्भवतात त्यावेळी अशा समुपदेशन केंद्राची निकड लक्षात येते असे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी यावेळी व्यक्त केले.
कल्याण पश्चिम येथील चिकणघर परिसराव्यतिरिक्त मोहन खेडा- मोहने, सप्तगिरी- कल्याण पूर्व, पेंडसे नगर डोंबिवली- पूर्व आणि आनंद नगर – डोंबिवली पश्चिम या परिसरातही समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत असून महापालिका शाळां मधील विद्यार्थ्यांकरिता कल्याणसाठी व डोंबिवली विभागासाठी प्रत्येकी एका समुपदेशकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली. या समुपदेशन केंद्रात एक समुपदेशक व आवश्यकतेनुसार लिगल अडवायझरचे सहकार्य नागरिकांसाठी उपलब्ध राहील अशी माहिती वुमन्स वेल्फेअर फाउंडेशन च्या अध्यक्षा मीनाक्षी उज्जैनकर यांनी या कार्यक्रमात दिली.













Leave a Reply