डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने क्रीडा संकुल व नाट्यगृह पुनर्विकासास सुरुवात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण
डोंबिवली
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या विकासयोजनेला आज नवीन गती मिळाली. “व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी असेल, तर शहराचा कायापालट निश्चित”—उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले हे मत डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कामातून प्रत्यक्षात उतरलेले दिसत आहे.
शनिवारी डोंबिवलीतील वै. ह. भ. प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरणाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे, १८० कोटींच्या टप्पा-१ क्रीडा प्रकल्पासोबत १५ कोटींच्या नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यास आज हिरवा कंदील मिळाला. याच वेळी क्रीडा संकुल परिसरातील प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटरचे उद्घाटन देखील करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,
“राज्यात प्रत्येक शहराला भरीव निधी देण्याचा आमचा संकल्प आहे. ‘शासन आपल्या दारी’मुळे नागरिकांच्या हातातच सरकारी सुविधा पोहोचल्या. महिला, युवक, शेतकरी आणि कामगारांसाठी राबवलेल्या योजनांमुळे मोठा दिलासा मिळत आहे. कल्याण–डोंबिवलीसाठीही कोट्यवधींचा निधी देत आहोत आणि विकास आणखी वेग घेणार आहे.” त्यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहील, अशी स्पष्टोक्तीही दिली.
खासदार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की,
“२०१४ नंतर या शहरात कामांची खरी सुरुवात झाली. राजकारणापेक्षा प्राधान्य नेहमी विकासालाच दिले. मेट्रो, उड्डाणपूल, सहापदरीकरण, रेल्वे मार्गिका—मोठे प्रकल्प आज प्रत्यक्षात आकार घेत आहेत. या कामांमुळे कल्याण–डोंबिवलीचे रूपांतर घडत आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि “इथून अनेक महान खेळाडू घडतील,” असा त्यांचा विश्वास आहे.
🏗️ प्रकल्पाचा आढावा :
- क्रीडा संकुल पुनर्विकास – शहराचा गेमचेंजर
- निधी: एमआयडीसी
- व्यवस्थापन: कल्याण–डोंबिवली महापालिका
- २५,००० चौ.मी. बहुमजली इमारत
- आंतरराष्ट्रीय मानकांचा स्विमिंग पूल
- डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म
- १६,००० चौ.मी. तळघर पार्किंग
- इंडोर स्पोर्ट्स: योगा, जिम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, जुडो, स्क्वॅश, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक
- आधुनिक निवासव्यवस्था, फिजिओथेरपी सेंटर, बॅक्वेट हॉल्स, मल्टिपर्पज सभागृह
सावित्रीबाई फुले नाट्यगृह – कला संस्कृतीला नवा श्वास
- अत्याधुनिक प्रकाश व ध्वनी व्यवस्था
- सुसज्ज रंगमंच
- प्रशस्त आसनव्यवस्था
- नव्याने उभारलेले कॅन्टीन व अन्य आधुनिक सुविधा

🎤 कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
मंत्री उदय सामंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, पद्मश्री गजानन माने, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त अभिनव गोयल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.














Leave a Reply