कल्याण–डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५: मतदान १५ जानेवारीला, निकाल १६ रोजी
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ आहे. उमेदवारांची अंतिम यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापालिकेची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी व निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केले जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, मतदान ईव्हीएम (EVM) यंत्राद्वारेच होणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार (★★) चिन्ह देण्यात आले असून, अशा मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
निवडणूक खर्च मर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे —
अ वर्ग: ₹१५लाख
ब वर्ग: ₹१३ लाख
क वर्ग: ₹११ लाख
ड वर्ग: ₹९ लाख
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, येत्या काही दिवसांत उमेदवारांची धावपळ वाढण्याची शक्यता आहे.













Leave a Reply