डोंबिवली
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे नवीन कार्यालय सोमवार, १५ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव येथे सुरू करण्यात आले.
या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादूसिंग महेर, भाजपाचे माजी नगरसेवक विनोद काळण, युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे, कार्याध्यक्ष अनिल राठोड, सहसचिव रेड्डी पवार, निवासी नाका उपाध्यक्ष विठू पवार, खजिनदार निवासी नाका हरिदास कोल्हे यांच्यासह कौसर शहा, संजय परदेशी, योगेश शेजूळ, सोमनाथ शेजूळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या, न्यायहक्क व संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.













Leave a Reply