डोंबिवली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कल्याण–डोंबिवली परिसरातील विविध पदांवर नव्या नियुक्त्यांचे पत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्त्यांमुळे मनसेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
डोंबिवली शहर अध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. मनोज घरत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसे विद्यार्थी सेनेच्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी प्रतीक देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी सचिव म्हणून राहूल कामत यांची नेमणूक करण्यात आली असून, महिला शहर अध्यक्षपदाची जबाबदारी कोमल पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नेते राजू पाटील उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटन मजबूत करण्याचे आणि स्थानिक प्रश्नांसाठी अधिक आक्रमकपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
ही नियुक्ती मनसेच्या स्थानिक नेतृत्वाला नवी ऊर्जा देणारी ठरणार असून कल्याण–डोंबिवलीत पक्षाची पकड अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













Leave a Reply