नाथ पै एकांकिका स्पर्धेत सहभाग
कल्याण
अस्तित्व थिएटर, कल्याण यांची ‘द लास्ट नाईट’ ही एकांकिका आगामी नाथ पे एकांकिका स्पर्धेत सादर होणार असून, या एकांकिकेत प्राची जोशी, श्रीरंग सायकर आणि मनोज गांगुर्डे हे कलाकार प्रमुख भूमिकेत काम करत आहेत. आशयघन मांडणी, प्रभावी अभिनय आणि तांत्रिक बाजूंच्या भक्कम तयारीमुळे ही एकांकिका स्पर्धेत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
या एकांकिकेचे लेखन मनोज गांगुर्डे यांनी केले असून, दिग्दर्शन विजय आयरे यांचे आहे. नेपथ्य अमित इंदुलकर, पार्श्वसंगीत आशुतोष वाघमारे, तर प्रकाश योजना विनोद राठोड यांनी सांभाळली आहे. रंगभूषा संजय गावडे तर वेशभूषा मिलिंद ढगे यांनी केली आहे. तर कलाकार म्हणून प्राची, श्रीरंग आणि मनोज अभिनय सादर करणार आहेत.
ही स्पर्धा आचरकर प्रतिष्ठान नाट्यगृह, कणकवली येथे शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, ‘द लास्ट नाईट’कडून दमदार सादरीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply