Power by The Web Cloud Media

निखिल चौधरींचा १२८० मतांनी दणदणीत विजय

अंबरनाथ

अंबरनाथ बदलापूर परिसरात राजकीय चर्चांना वेग आला असतानाच, निखिल चौधरी यांनी आपल्या पहिल्याच निवडणूक लढतीत दणदणीत विजय मिळवत राजकारणात एंट्री केली आहे. तब्बल १२८० मतांच्या फरकाने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जनतेचा विश्वास जिंकला.

राजकीय जीवनाची ही सुरुवात अनेकांना लक्षवेधी वाटावी अशीच आहे. सुनील चौधरी यांच्या धाटणीची ठाम भूमिका, कणखर नेतृत्व आणि मैदानात उतरतानाच दिसणारा आत्मविश्वास या सगळ्यांची चर्चा मतमोजणीनंतरही सुरू आहे. सुनील यांच्या मार्गदर्शनाची साथ आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे निखिल चौधरींच्या राजकीय वाटचालीला बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 निखिल चौधरी हे उच्चशिक्षित असून विकासाभिमुख कामकाजावर त्यांचा ठाम भर राहणार असल्याचे ते सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *