Power by The Web Cloud Media

तळेगाव दाभाडेत ठाणे जिल्ह्याची वेटलिफ्टिंगमध्ये चमक

कल्याण

तळेगाव दाभाडे येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ, ज्युनिअर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. रिक्रेशन व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी विविध वजन गटांत सुवर्ण व रौप्य पदके पटकावत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

युथ गटात ४८ किलो वजनी गटात हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने सुवर्णपदक, ६३ किलो वजनी गटात साध्वी प्रल्हाद चौधरी हिने सुवर्णपदक, तर ७७ किलो वजनी गटात खुशी सुधीर सकपाळ हिने रौप्यपदक मिळवले. मुलांच्या गटात पार्थ पाल (६० किलो) याने रौप्यपदक, मित गदल्या घोडे (७१ किलो) याने सुवर्णपदक आणि राजस मनीष शिंदे (८८ किलो) याने सुवर्णपदक पटकावून ठाणे जिल्ह्यासाठी पदकांची भर घातली.

मुलांच्या गटात

या यशामागे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सुनील दळवी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून मिथिल चौधरी व रिक्रेशन व्यायाम शाळेच्या संपूर्ण समितीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

दरम्यान, नाना सिंहासने यांच्या स्मरणार्थ आयोजित विशेष कार्यक्रमात सौम्या सुनील दळवी हिने ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात १०० किलोपेक्षा अधिक वजन उचलल्याबद्दल तिचा अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारप्रसंगी राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सौम्या सुनील दळवी

ठाणे जिल्ह्यातील या यशस्वी कामगिरीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *