Power by The Web Cloud Media

निवडणूक प्रक्रियेवर सीसीटीव्हीची करडी नजर

केडीएमसीकडून सर्वंकष सुरक्षा व्यवस्था

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक राहावी, यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यापक व्यवस्था केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ९ कार्यालयांमध्ये एकूण १३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

याशिवाय लालचौकी येथील मध्यवर्ती स्ट्रॉंग रूमसह निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय ९ स्ट्रॉंग रूम अशा एकूण १० स्ट्रॉंग रूममध्ये १६५ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी पोलिस विभागाकडून २४ तास निगराणी ठेवण्यात येत आहे.

टपाली मतदान प्रक्रियेसाठी परिमंडळ–१ कार्यालयात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमसाठी ७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यावरही पोलिस विभागाचे सतत लक्ष आहे.

दरम्यान, मतदान साहित्य वाटप केंद्र, साहित्य जमा केंद्र तसेच मतमोजणी केंद्रांवरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ‘डिजिटल वॉच’ ठेवण्यात येणार आहे.

विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी विद्युत विभागामार्फत जनरेटरसह पर्यायी वीज पुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत व यांत्रिकी) प्रशांत रा. भागवत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *