कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या महत्त्वाच्या पदांवरील निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे उमेदवारी अर्ज शिवसेना भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसे नेते राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ताकारण आणि आगामी राजकीय समीकरणांवर नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.













Leave a Reply