Power by The Web Cloud Media

राज्यस्तरीय कथा अभिवाचन स्पर्धेत ‘मोर्चा’ प्रथम

२३ संघांचा उत्स्फूर्त सहभाग

कल्याण

नाट्य रसिकहो, कल्याण आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे तसेच कल्याण व डोंबिवली परिसरातील एकूण २३ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेत मुंबईच्या इरसाल स्टोरी टेलर्स संस्थेने सादर केलेल्या ‘मोर्चा’ या कथेला प्रथम क्रमांक मिळाला. पुण्याच्या ज्ञान वैखरी संस्थेच्या ‘ज्ञान तेच देव’ या कथेला द्वितीय, तर मुंबईच्या प्रायोगिक रंगमंच संघ यांच्या ‘राडा’ या कथेला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. तसेच स्टुडिओ-६४, पुणे यांच्या ‘डिअर फादर’, सुमंगल फाउंडेशन, कल्याण यांच्या ‘गुडघ्या एवढ्या महापुराची कहाणी’ आणि प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांच्या ‘बेईमान’ या कथांना सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

ज्ञान वैखरी, पुणे यांची ‘ज्ञान तेच देव’ कथा द्वितीय

आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगरसेविका नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांची ‘राडा’ तृतीय

परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य अभ्यासक अरुण कदम व आकाशवाणी निवेदिका श्रद्धा वझे यांनी काम पाहिले. स्पर्धकांनी पूर्ण तयारीनिशी सादर केलेल्या अभिवाचनाचे त्यांनी कौतुक केले, तसेच वेळेची मर्यादा पाळण्याबाबत सूचना दिल्या.

स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून वाढता प्रतिसाद समाधानकारक असल्याचे आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले. भविष्यात स्पर्धा अधिक आकर्षक व दर्जेदार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अभिनेते आनंद जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुढील वर्षांपासून प्रथम पारितोषिकाची रक्कम देण्याची घोषणा केली.

 

स्पर्धेचा अधिक तपशीलवार निकाल पुढीलप्रमाणे :

सर्वोत्कृष्ट अभिवाचक पुरुष

प्रथम- भूषण घाटपांडे

द्वितीय- दिनेश हातिम

तृतीय- कौशिक साऊळ

सर्वोत्कृष्ट अभिवाचक स्त्री

प्रथम- लीला हडप

द्वितीय- वर्षा देशमुख

तृतीय- अंजली गोडबोले

अभिवाचक उत्तेजनार्थ

सुनील घोणे

मृदुल निवसरकर

महेंद्र पाटील

नीलम सावंत

निलेश गवारे

नमिता आफळे

धनंजय हरिसंगम

युगंधरा वळसंगकर

विशेष सांघिक उत्तेजनार्थ दादा महाराज नाटेकर पंचकोशधारीत विद्यालय, पुणे (प्रमाणपत्र)

उत्कृष्ट डिझाईन स्पर्धा

प्रथम- पूनम पाटील अॅक्टींग अकॅडमी, नाशिक

द्वितीय- नावांकुर प्रतिष्ठान, कल्याण.

तृतीय- अस्तित्व थिएटर, कल्याण.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी व मार्गदर्शक श्रीरंग दाते, सुधीर रोकडे, संजय खेडेकर, आदित्य ढोबळे , सचिन पाटील, सुरेखा गेडाम, सुनंदा जाधव, राहुल शेलार, अमित पवार आणि अत्रे रंगमंदिर येथील व्यवस्थापनासह कार्यरत सुरक्षा रक्षक यांनीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपापल्या परीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *