कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत विविध पक्षांच्या नगरसेविकांना स्थान देण्यात आले असून शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीच्या शिव आघाडीचे 5 सदस्य, भाजपाचे 5 सदस्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा 1 सदस्य असा समावेश आहे.
शिव आघाडीच्या सदस्यांमध्ये रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव यांचा समावेश असून मनसेच्या रसिका पाटील यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे.
भाजपाकडून मेघाली खेमा, डॉ. पूजा गायकवाड, सरोज राय, सुनीता पाटील आणि रविना माळी यांची महिला व बाल कल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून तेजस्वी गायकवाड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महिला व बाल कल्याण समिती ही महानगरपालिकेतील महिला आणि बालकांच्या विकासाशी संबंधित विविध योजनांवर निर्णय घेणारी महत्त्वाची समिती मानली जाते. त्यामुळे या समितीच्या नियुक्त्यांकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.













Leave a Reply