April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

फोटोग्राफी स्पर्धेत गजानन दुधनकर प्रथम

ठाणे

”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लि.आणि ठाणे महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत गजानन दुधनकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून या स्पर्धेतील विजेत्यांना महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा तसेच इतर सन्मानीय पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिली.

ठाणे स्मार्ट सिटी लि. आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाण्यातील हवामान बदलाचे परिणाम आणि व्यक्ती, समुदाय किंवा व्यक्तींनी केलेल्या कृतींवर आधारित फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गजानन दुधनकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय क्रमांक विभागून महेश अंबरे, परेश पिंपळे, सुषमा लहेरी व गायत्री दांडेकर यांनी पटकाविला आहे. तसेच अतुल मालेकर, शाश्वत मोहपात्रा, पल्लवी यादव, वैभव नाडभावकर व गजानन दुधकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे.

या फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १० हजार द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये ५ हजारची ४ पारितोषिके, तर विशेष पुरस्कारासाठी रोख रुपये २ हजारची ५ पारितोषिके महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा तसेच इतर सन्मानीय पदाधिकारी यांच्या हस्ते महापालिका भवन येथे देवून गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी सुधीर गायकवाड-इनामदार, केदार भिडे व अजित दत्तात्रय जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले आहे.