मनसेमध्ये कल्याण पूर्वेला पहिल्यांदाच राज्यस्तरीय पद
कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर कल्याण पूर्वेतील युवा कार्यकर्ते निर्मल निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निगडे यांच्या रूपाने मनसेमध्ये कल्याण पूर्वेला पहिल्यांदाच राज्यस्तरीय पद मिळाल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते व कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनचे अध्यक्ष सतीश नारकर यांनी कल्याण पूर्वेतील निर्मल निगडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्मल निगडे हे गेली अनेक वर्षे मनसेमध्ये सक्रियपणे काम करत असून याआधी त्यांनी अनेक जवाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
पक्षाने आपल्यावर सोपविलेली ही नवीन जवाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून पक्ष संघटना वाढीसाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी निर्मल निगडे यांनी दिली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास